Rubina Dilaik Ate Just Boiled Spinach Soup for a Year to Lose Weight : टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या फिटनेस आणि स्लिम फिगरसाठी ओळखली जाते. टीव्ही स्टार रुबिना दिलैकने वजन कमी करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

रुबीनाला टीव्ही इंडस्ट्रीत आल्यावर वजन कमी करण्यास सांगण्यात आले होते. साईज झिरो नसल्याबद्दल तिला टीकेचा सामना करावा लागला होता. तिला इतके भाग पाडण्यात आले की अभिनेत्रीने वजन कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले होते.

तुम्हाला माहिती आहे का की, झिरो फिगर मिळवण्यासाठी रुबिनाने वर्षभर फक्त पालकाचे सूप प्यायले? अलीकडेच एका मुलाखतीत तिने स्वतः हा धक्कादायक खुलासा केला, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

रुबिना तिच्या पॉडकास्टमध्ये म्हणाली, “हा माझा पहिला टीव्ही शो होता आणि माझ्या लूकमुळे सर्वांसमोर मला ओरडण्यात आले. मी नाराज होते. मी एक वर्ष फक्त पालक सूप पित होते आणि स्वतःला वचन दिले की मला बारीक व्हायचे आहे.”

‘माझे वजन कमी झाले, पण…’ : रुबिना दिलैक

रुबिना पुढे म्हणाली, “माझे वजन कमी झाले, मी कमकुवत दिसू लागले. माझी ऊर्जा खूप कमी झाली होती. जेव्हा मी त्या काळाकडे मागे वळून पाहते तेव्हा मला वाटते, त्यावेळी मी काय विचार करत होते? जेव्हा मी स्वतःशी असे केले तेव्हा मी काय विचार करत होते.”

रुबिनाने पॉडकास्टदरम्यान असेही सांगितले की, जेव्हा ती इंडस्ट्रीमध्ये सामील झाली नव्हती तेव्हा ती डोंगराळ भागातला साधा, पौष्टिक आहार घ्यायची – तूप, दूध, दही, सर्वकाही. पण, ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यानंतर तिचा आहार पूर्णपणे बदलला आणि त्याचा तिच्या शरीरावरही परिणाम झाला. ती म्हणाली, “मला त्यावेळी कोणी शिकवले असते की मी स्वतःला जसे आहे तसे स्वीकारावे तर चांगले झाले असते.”

रुबिनाने तिच्या अनुभवावरून लोकांना समजावून सांगितले की, वजन कमी करण्यात काहीही चूक नाही, पण पद्धत योग्य असली पाहिजे. ती म्हणाली की, मी जे केले ते कोणीही करू नये. आरोग्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, बाकी सर्व काही नंतर येते.