नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबईमध्ये पार पडले. त्यांच्या या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील अनेकांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. या रिसेप्शन पार्टीमध्ये बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यापासून ते क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरपर्यंत सारेच सहकुटुंब या रिसेप्शनला हजर राहिले होते. यावेळी साराने घातलेला ड्रेस हा यावेळेचा चर्चेचा विषय ठरला होता.

पण तुम्हाला माहितीये का की, साराने विरुष्काच्या रिसेप्शनला जो ड्रेस घातला होता तो तिने याआधीही घातला होता. साराने आजीला लंडन येथे मिळालेल्या पुरस्कार सोहळ्यातही हाच ड्रेस घातला होता. साराची आजी अॅनबेल मेहता या मुंबईतील एनजीओ ‘अपनालय’ येथे समाजातील दुर्लक्षित जाती-जमातीच्या लोकांसाठी काम करतात. यासाठी त्यांना लंडन येथे पुरस्कार देण्यात आला होता.

या पुरस्कार सोहळ्याला साराने उपस्थिती लावली होती. यावेळी तिने आजीसोबत अनेक फोटोही काढले होते. या पुरस्कार सोहळ्याला घातलेला ड्रेस आणि विरुष्काच्या रिसेप्शनचा ड्रेस सारखाच आहे. त्यामुळे सध्या साराचे हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
साराने पांढऱ्या रंगाचा वनपीस घातला होता. या वनपीसलाच साजेसे कानातले तिने घातले होते. साराला नेहमीच कमीत कमी मेकअपमध्ये पाहण्यात आले आहे. साराचे सौंदर्य पाहून अनेकदा तिच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी चर्चा होतात पण सध्या तरी तिची सिनेसृष्टीत येण्याची चिन्हे दिसत नाहीत हेच खरे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.