सध्या सोशल मिडीयावर अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा आणि तिचा कथित प्रियकर वीर पहारिया यांच्या प्रेमप्रकरणाची प्रचंड चर्चा रंगली आहे. सारा करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ती प्रचंड चर्चेत आली आहे. साराचा कथित प्रियकर वीर पहारिया याच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे दोघांचे प्रेमकरण अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. सध्या साराचे एक छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार सारा सोबत असलेला हा मुलगा वीर पहारिया आहे. वीर हा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सारा आणि वीर दुबईत एकत्र शिकतात. वीर आणि सारा हे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा चर्चाही सध्या सुरु आहेत. या दोघांच्या फोटोंमुळे मात्र या चर्चांसाठी चांगलेच खाद्य मिळाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2016 रोजी प्रकाशित
सैफ अली खानची मुलगी सुशिलकुमार शिंदे यांच्या नातवाच्या प्रेमात ?
सारा आणि वीर दुबईत एकत्र शिकतात.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 07-05-2016 at 11:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan beautiful daughter sara ali khan dating veer pahariya grandson of sushil kumar shinde see pictures