सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान एका अभिनेत्रीचा नृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नदी काठी एक अभिनेत्री एका गाण्यावर नृत्य करत असताना पाय घसरून पडते. व्हिडिओत त्या अभिनेत्रीला जोरात लागल्याचेही तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवते.

या व्हिडिओमध्ये पडलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ती रिंकू राजगुरू असल्याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. हा व्हिडिओ तिच्या ‘मनसूमलिगे’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा असल्याचे काहींचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर तर रिंकूच्या नावाने मेसेज लिहून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. सैराट सिनेमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरूच या व्हिडिओमध्ये आहे असे अनेकांचे म्हणणे असले तरी ती रिंकू नसल्याचे स्पष्टीकरण रिंकूच्या बाबांनी महादेव राजगुरू यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिंकूने ‘आर्ची’ च्या भूमिकेतून आपल्या रावडी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. ‘सैराट’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अवघ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा होती ती तिच्या आगामी सिनेमाची. रिंकू लवकरच एका मराठी सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रिंगण’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचे दिग्दर्शक मकरंद माने यांच्या नव्या सिनेमात रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमाचे नाव अद्याप कळले नसले तरी सर्वांना भावेल असे कथानक या सिनेमात पाहायला मिळणार आहे.