बॉलीवूडमध्ये अभिनेता सलमान खान आणि त्याचे कुटुंबिय प्रत्येक सण उत्साहात साजरा करण्यासाठी ओळखले जातात. याच खान कुटुंबियांच्या घरी दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाही सलमानच्या घरी गणपती विराजमान झाला असून सलमानची बहीण अर्पिताने ट्विटरवर त्याचे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय, गणपतीसाठी खास चॉकलेटच्या मोदकांचा नैवेद्य तयार करण्यात आला आहे. गणपतीच्या दर्शनासाठी सलमानच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना या मोदकांचा प्रसाद दिला जाणार आहे.
1 day to go to welcome him home, our beautiful Eco friendly Ganpati Bappa ?? love this festival ? pic.twitter.com/ITmt7N285I
— Arpita Khan Sharma (@khanarpita) September 15, 2015
A photo posted by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on