‘दबंग’ चित्रपटाच्या दोन सिक्वलच्या यशानंतर सलमान खान ‘दबंग ३’ या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या दोन चित्रपटांमध्ये चुलबुल पांडेची ‘रज्जो’ म्हणून दिसलेली सोनाक्षी सिन्हा यावेळी पुन्हा रज्जोच्या रुपात दिसणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘दबंग ३’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. आगामी चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत दिसणारी ही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची कमी भरुन काढेल का? हे सांगणे कठीण आहे. पण ही अभिनेत्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा नव्वदीच्या दशकाची आठवण नक्कीच करुन देईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड वर्तूळातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानसोबत या चित्रपटात काजोल झळकणार असल्याचे समजते. काजल-सलमान ही जोडी प्रेक्षेकांसाठी नवीन नाही. या चित्रपटात काजलची मुख्य भूमिका पक्की झाल्यास नव्वदीनंतर बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना काजल आणि सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील. यापूर्वी ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात सलमान- काजल यांच्यातील प्रेम कथा पाहायला मिळाली होती. सोहेल खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अरबाज खानने काजलच्या भावाची भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वी ‘दबंग ३’ मध्ये दमदार भूमिका नसल्याने काजलने या चित्रपटाला नकार दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या . त्यानंतर आता पुन्हा या चित्रपटात काजल मुख्य भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘दबंग २’ मध्ये सोनाक्षी सिन्हानेच चुलबुल पांडेच्या रज्जोची भूमिका साकारली होती. मात्र आगामी ‘दबंग ३’ मध्ये रज्जोच्या भूमिकेत काजोलला पाहायला तिचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan and kajol will come together in dabangg
First published on: 24-10-2016 at 21:26 IST