गेली दोन वर्षे आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे एकमेकांना डेट करत असल्याचं बॉलीवूडमध्ये बोललं जात होतं. अभिनेत्रीने तिच्या रिलेशनशिपवर ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये देखील भाष्य केलं होतं. तसेच या दोघांचे एकत्र फिरायला गेल्याचे फोटो सुद्धा अनेक ठिकाणी व्हायरल झाले होते. सगळं उत्तम सुरू असतानाच गेल्या महिन्याभरापासून आदित्य आणि अनन्याचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच त्यांच्या जवळच्या मित्रांने दोघांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य आणि अनन्याच्या जवळच्या मित्राने अलीकडेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना या दोघांच्या नात्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताला या जवळच्या मित्राने दुजोरा दिला आहे. “दोघेही साधरण महिन्याभरापूर्वी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. दोघांचं बॉण्डिंग खूपच स्ट्राँग होतं. परंतु, ते दोघेही वेगळं होणं हे आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. सध्या अनन्या या ब्रेकअपच्या मानसिकतेतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. कोणासाठीही ब्रेकअप होणं हे दु:खदायकच असतं.” असा खुलासा दोघांच्या जवळच्या मित्राने केला आहे.

हेही वाचा : Video : आलियाची लाडकी लेक पहिल्यांदाच काकाबरोबर फिरताना दिसली…; राहा कपूरचे हावभाव पाहून नेटकरी म्हणाले…

आदित्य गेल्या महिन्यात अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेच्या डोहाळे जेवणाला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यानंतर लगेचच आदित्य-अनन्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अखेर या वृत्ताला त्यांच्याच जवळच्या मित्राने दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

अनन्या पांडेच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना झालेली सुरुवात

अनन्या पांडेने काही दिवसांआधी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. “जर एखादी गोष्ट केवळ तुमच्यासाठी बनली असेल, तर ती नक्कीच तुमच्याकडे परत येईल. जर ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर, तुम्हाला निश्चितच एक मोठा धडा मिळतो. जर तुमचं एखाद्या गोष्टीवर खरंच तुमचं प्रेम असेल तर, ती गोष्ट कायम तुमच्या हृदयात राहते.” असा मजकूर अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये होता.

हेही वाचा : Video : अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आली अनुष्का शर्मा! विराट कोहली बाद झाल्यावर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

दरम्यान, अनन्या आणि आदित्य गेली दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना अनेकदा पापाराझींनी एकत्र पाहिलं आहे. याशिवाय करणच्या शोमध्ये अभिनेत्रीने स्वत: त्यांच्या नात्याबद्दल संकेत दिले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya roy kapur and ananya panday broke up almost month ago says reports sva 00
First published on: 05-05-2024 at 21:17 IST