बॉलीवूड कलाकारांपेक्षा सध्या सोशल मीडियावर स्टारकिड्सची मोठ्या प्रमाणात चर्चा असते. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांची जोडी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. परंतु, या दोघांपेक्षा जास्त आता त्यांची लेक राहा कपूर चर्चेत असते. तिचा गोड अंदाज, थक्क करणारे हावभाव या गोष्टींची सध्या नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर करत चाहत्यांना राहा कपूरचा जन्म झाल्याचं सांगितलं. यानंतर जवळपास वर्षभराने आलिया-रणबीरने त्यांच्या लेकीचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला.

हेही वाचा : ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत होणार एन्ट्री! साकारणार ‘ही’ भूमिका

२०२३ मध्ये ख्रिसमसच्या दिवशी आलिया-रणबीरने सर्वांना राहाची पहिली झलक दाखवली. पहिल्याच दिवशी राहाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सर्वजण राहाचं कौतुक करत होते. सध्या आलियाच्या लेकीच्या अशाच एका नवीन व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Video : अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आली अनुष्का शर्मा! विराट कोहली बाद झाल्यावर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

नेहमी आलिया-रणबीरबरोबर फिरणारी राहा यावेळी मात्र ब्रह्मास्त्र चित्रपटाचा दिग्दर्शक आणि रणबीरचा जवळचा मित्र अयान मुखर्जीबरोबर फेरफटका मारताना दिसली. अयान आणि रणबीर-आलियाची एकमेकांशी खूप घट्ट मैत्री आहे. त्यामुळे राहा पहिल्यांदाच काकाबरोबर फिरताना दिसली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात पापाराझींची गर्दी आणि त्यात मुंबईच्या उन्हामुळे हैराण झालेल्या राहाने काहीसे वेगळे हावभाव दिले. याशिवाय अयान मुखर्जी सुद्धा वैतागून “माझ्या मागे येऊ नका” असं पापाराझींना सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : OTT Releases : घरबसल्या पाहता येणार ‘हे’ १० चित्रपट अन् वेबसीरिज; अजय देवगणच्या थरारक चित्रपटाचा समावेश, वाचा यादी

नेटकऱ्यांनी मात्र राहाच्या या नव्या व्हिडीओवर पुन्हा एकदा लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “राहा एकदम ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते”, “तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव नेहमीच बघण्यासारखे असतात”, “पापराझींनी असं करू नये राहा खूपच लहान आहे”, “राहामध्ये आम्हाला राज आणि ऋषी कपूर यांची झलक दिसते” अशा कमेंट्स युजर्सनी या व्हायरल व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor alia bhatt daughter raha steps out with ayan mukerji watch video sva 00