मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे स्वत:च्या लेकीचं लग्न असतानाही फणसाळकरांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि ते महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या व्यवस्थापनासाठी पोहोचले. मोर्चा संपल्यावर त्यांनी लग्नाला हजेरी लावली आणि वडील असण्याचं कर्तव्य पार पाडलं. शनिवारी विवेक फणसाळकर यांची एकुलती एक लेक मैत्रेयीचं लग्न होतं. त्यानंतर तिचा रिसेप्शन सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडकरांनीही हजेरी लावली.

अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची मुलगी मैत्रेयी फणसाळकर हिच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली. या रिसेप्शन सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

“मला मारण्याचा प्रयत्न केला जातोय, तर मग सुशांतलाही…”; अमिताभ बच्चन व सलमान खानचा उल्लेख करत अभिनेत्याचा आरोप

मैत्रेयीचा रिसेप्शन सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. सलमान खान काळ्या रंगाचा सूट परिधान करून कार्यक्रमात पोहोचला आणि त्याने वधू-वरांबरोबर पोज दिल्या. तर, शिल्पा शेट्टीही लाल रंगाची साडी नेसून या कार्यक्रमात पोहोचली होती. तिनेही नवविवाहित जोडपे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर फोटो काढले.

दरम्यान, रणवीर सिंगने त्याचा उत्साह आणि वेगळेपण या रिसेप्शन सोहळ्यातही कायम ठेवलं. रणवीरने स्टेजवर परफॉर्म केला. त्याने त्याचा हिट चित्रपट ‘सिम्बा’मधील गाणं ‘आंख मारे’ गायलं आणि डान्सही केला. तिथे उपस्थितांनीही त्याच्याबरोबर गाणं गायलं आणि त्याला दाद दिली.

रणवीरचा निर्माता रोहित शेट्टीसोबतचा तिसरा कॉमेडी चित्रपट ‘सर्कस’ २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर, सलमान पुढील वर्षी ‘पठाण’मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. याशिवाय त्याचा अॅक्शन-कॉमेडी ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर ३’ प्रदर्शित होणार आहेत.