सध्या सलमान खान आपल्या दबंग-३ ची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे. सलमानच्या चित्रपटांप्रमाणेच त्याची गाणीही हिट होत असतात. यापूर्वी सलमानच्या दबंगमधल्या ‘मुन्नी बदनाम हुई’ हे गाण फार हिट झालं होतं. त्यानंतर आता सलमानचं नवं गाणं ‘मुन्ना बदनाम हुआ’ सोमवारी रिलिज झालं. अवघ्या काही तासातच या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.

२०१० मध्ये सलमानच्या दबंग या चित्रपटातलं मुन्नी बदनाम हुई हे गाणं सर्वांच्या पसंतीस उतरलं होतं. या गाण्याच्या तालावर अनेक जण आताही थिरकताना आपल्याला पहायला मिळतात. त्याच प्रकारचं असलेलं मुन्ना बदनाम हुआ हे गाणं सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. ४ मिनिटं ६ सेकंदाच्या या गाण्यानं सर्वांनाच भूरळ घातली आहे. ममता शर्मा, कमाल खान आणि बादशाहनं हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. तर दानिश शबरीनं हे गाणं लिहिलं आहे. तर साजिद वाजिद यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

‘दबंग – ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग – ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमिवर विचार ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.