‘अंतिम’च्या पोस्टरवर चाहत्यांनी केला दूधाचा अभिषेक भाई संतापला, “इथे लोकांना…”

सलमानने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

salman khan, salman khan antim
सलमानने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडचा भाईजान आणि अभिनेता सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सलमानचे लाखो चाहते आहेत. सलमानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलमानच्या काही चाहत्यांनी थेटरमध्ये फटाके फोडले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काही चाहत्यांनी ‘अंतिम’च्या पोस्टरवर दूधाने अभिषेक केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सलमानने संताप व्यक्त केला आहे.

सलमानने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओतर सलमानचे काही चाहते ढोल-ताशा घेऊन चित्रपट पाहण्यासाठी गेले आहेत. यावेळी त्यांनी अंतिमच्या पोस्टरवर दुधाने अभिषेक केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सलमान म्हणाला, “काही लोकांना प्यायल पाणी मिळतं नाही आणि तुम्ही असं दूध वाया घालवत आहात. माझी माझ्या चाहत्यांना एकच विनंती आहे की तुम्हाला दूध द्यायचं आहे तर त्या गरीब मुलांना द्या ज्यांना दूध प्यायला मिळत नाही.”

आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…

आणखी वाचा : एकट्या ऐश्वर्याने ३० लोकांना वाढले होते जेवण, विशाल दादलानीने सांगितला किस्सा

सलमान सोबत आयुष शर्मा या चित्रपटात आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाने २ दिवसात १०.२५ कोटी रुपये कमावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan fans bathe antim poster with milk actor urges to donate it to poor children instead of wasting dcp