चांगल असो किंवा वाईट बॉलीवूडचा दबंग सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. आपल्यावर ओढावलेल्या संकटांना आपण स्वतःच कारणीभूत असल्याचे त्याने म्हटले आहे.
“मला नाही वाटतं माझ्या आयुष्यात कुणा दुस-याने संकट आणली आहेत. जर याला कोणी जबाबदार असेल तर – ते माझे नशीब, नियती आणि मी,” असे सलमान ‘बिग बॉस ९’ या रिअॅलिटी शोच्या पत्रकार परिषदेवेळी म्हणाला. मी जर आयुष्यात पुढे गेलो असेन तर त्याचे श्रेय माझे कुटुंबिय, मित्रमंडळी आणि मिडियाला जाते, असेही तो म्हणाला. सहाव्यांदा सलमान बिग बॉसच्या सूत्रसंचालकाचे पद भूषवत आहे.’बिग बॉस’चे नववे पर्व ११ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2015 रोजी प्रकाशित
माझ्यावर ओढावलेल्या संकटांना मीच जबाबदार- सलमान खान
चांगल असो किंवा वाईट बॉलीवूडचा दबंग सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 29-09-2015 at 14:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan i am responsible for my troubles