‘जाणिवा’च्या ट्रेलरचे सलमानच्या हस्ते अनावरण

‘जाणिवा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानच्या हस्ते करण्यात आले. चित्रपटाची कथा ‘अरुणा शानबाग’ प्रकरणाभोवती गुंफण्यात आली आहे.

‘जाणिवा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानच्या हस्ते करण्यात आले. चित्रपटाची कथा ‘अरुणा शानबाग’ प्रकरणाभोवती गुंफण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. सॉफ्टेल हॉटेलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यास चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. रेणुका शहाणे आणि ऊषा नाडकर्णी यांनी क्रार्यक्रमाच्या ठिकाणी प्रथम उपस्थिती लावली. मिलिंद विष्णु, श्रमन जैन आणि सत्या मांजरेकर उपस्थितांचे स्वागत करत होते. महेश मांजरेकर हैदराबादवरून थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झाले होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या सलमान खानने आपल्याला ट्रेलर आवडल्याची प्रतिक्रिया दिली. सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर, गिरीश वानखेडे, श्रगुण, रवी, एकता जैन असे अनेक मान्यवर चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सत्या मांजरेकर, संकेत अग्रवाल, वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी आणि देवदत्त दाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.’ एंजल प्रॉडक्शन’ आणि ‘ब्ल्यू आय प्रॉडक्शन’ची निर्मिती आसलेला ‘जाणिवा’ चित्रपट ३१ जुलै रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan launched the trailer of satya manjrekar marathi film janiva at sofitel

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या