सलमान खान बॉलीवूडमधील तीन खान पैकी एक खान…. या सलमानसाठी लाखो तरुणी आजही घायाळ होतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांचा लाडका असलेला सलमान खान याने राकेश बापट या अभिनेत्याला शाबासकीची थाप दिली आहे. हिंदी मालिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा राकेश बापट सध्या खूप खुश आहे. जबरदस्त अॅक्शन, ड्रामा आणि एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला असलेल्या वृंदावन सिनेमात राकेश मुख्य भूमिका साकारत आहे. राकेशची ही पहिलीच अॅक्शन फिल्म असून सुपरस्टार सलमान खान यानेही राकेशच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. मुळातच वृंदावन सिनेमाची टीम ही साउथ बॅकग्राउंड असल्याने हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक नामवंत कलाकारांना दाखवण्यात आली. यामध्ये रोहित शेट्टी, सलमान खान यांचाही समावेश होता. हा सिनेमा पाहिल्यानंतर या सिनेमासाठी तुम्हाला माझी गरज नाही, हा सिनेमा सुपरहिट आहे, अशी प्रतिक्रिया सलमानने दिली. ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’ या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर ह्या तिघांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. गणेश आचार्य यांनी सिनेमातल्या कलाकारांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं असून अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2015 रोजी प्रकाशित
तुम्हाला माझी गरज नाही, हा चित्रपट सुपरहिट आहे- सलमान खान
या सिनेमासाठी तुम्हाला माझी गरज नाही, हा सिनेमा सुपरहिट आहे, असे सलमान म्हणाला.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 28-11-2015 at 13:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan praise the work of rakesh bapat