मित्र-शत्रू-मित्र असे अनोखे नाते असणारे बॉलीवूडमधील दोन सुपरस्टार म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान. शाहरुख आणि सलमानचे मैत्रीचे संबंध पुन्हा जुळून आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनाही हायसे वाटले. आज शाहरुखच्या ‘फॅन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सलमानने आपण शाहरुखचे फॅन असल्याचे ट्विट केले आहे.
सलमानने फॅन चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असून, मी शाहरुखचा फॅन आहे असे म्हटलेयं. शाहरुखच्या चित्रपटाचे सलमानने प्रमोशन करण्याची ही काही पहिलीचं वेळ नाही. यापूर्वी त्याने, ‘दिलवाले’ चित्रपटाबाबतही ट्विट केले होते. याच्याबदली शाहरुखने सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचा डबस्मॅश तयार करून पोस्ट केला होता.
मनिष शर्मा दिग्दर्शित आणि यशराजची निर्मिती असलेल्या ‘फॅन’ चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसेल. शाहरुख चित्रपटात ‘आर्यन खन्ना’ नावाच्या एका सुपरस्टारची भूमिका साकारत असून, त्याचा चाहता दाखविण्यात आलेला ‘गौरव’ देखील शाहरुखनेच साकारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan says he is a shah rukh khan fan
First published on: 01-03-2016 at 20:09 IST