scorecardresearch

Premium

मोहनीश बहलच्या मुलीला सलमान करतोय बॉलिवूडमध्ये लाँच

अनेकांचे करिअर मार्गी लावणारा हा ‘भाईजान’ आता दिवंगत अभिनेत्री नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

mohnish bahl and his daughter
अभिनेता मोहनीश बहल आणि त्याची मुलगी प्रनुतन बहल

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान अनेक नवोदित कलाकारांसाठी गॉडफादर आहे. कतरिना कैफ, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा अशा बऱ्याच कलाकारांना त्याने बॉलिवूडमध्ये आणलं. एखाद्या नवोदित कलाकारावर सलमानचा वरदहस्त असला की चित्रपटसृष्टीत त्याच्या प्रवेशाचा मार्ग निश्चित झालाच म्हणून समजा. अनेकांचे करिअर मार्गी लावणारा हा ‘भाईजान’ आता दिवंगत अभिनेत्री नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याविषयीची माहिती दिली. मोहनीशची मुलगी प्रनुतनला सलमान बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. या चित्रपटात प्रनुतनसोबतच आणखी एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे झहीर इक्बाल. सलमानच्या मदतीने हे दोन नवोदित कलाकार त्यांच्या करिअरचा शुभारंभ करणार आहेत.

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
Suhani Bhatnagar
‘डरमॅटोमायोसायटिस’ आजार आहे तरी काय? ज्यामुळे ‘दंगल’गर्ल सुहानी भटनागरचे निधन
actress was in love with ravindra mahajani
लोकप्रिय अभिनेत्रीला रवींद्र महाजनींशी करायचं होतं लग्न, त्यांच्या पत्नी खुलासा करत म्हणाल्या, “तिने गाडीतून उडी मारली अन्…”
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’

मोहनीश बहल आणि सलमान या दोघांमधले मैत्रीचे नाते तसे जुनेच. ‘हम आपके है कौन?’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले. या दोन्ही चित्रपटांत मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.

‘Stree’ Box Office Collection: ‘स्त्री’ने पार केला १०० कोटींचा टप्पा

प्रनुतन आणि झहीरच्या या चित्रपटाची निर्मिती ‘सलमान खान फिल्म्स’, मुराद खेतानी आणि अश्विन वर्दे करणार आहेत. तर नितीन कक्कर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या चित्रपटाची संपूर्ण शूटिंग काश्मीरमध्ये पार पडणार आहे.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan to launch mohnish bahl daughter pranutan

First published on: 17-09-2018 at 11:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×