सलमान खानच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानची निर्दोष सुटका झाल्यामुळे गँगस्टरने धमकी दिली आहे.

काळवीट शिकार प्रकरणात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने १८ जानेवारीला दिलासा दिला.

काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानची न्यायलयात बाजू मांडणा-या वकिलाने आंतरराष्ट्रीय गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा केला आहे. फोन करणा-या व्यक्तिने आपण आंतरराष्ट्रीय गँगस्टर असल्याचे वकील एच.एम. सारस्‍वत यांनी सांगितले.

काळवीट शिकार प्रकरणात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने १८ जानेवारीला दिलासा दिला. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची न्यायालयाने निर्दोष सुटका करण्यात आली. या गुन्ह्याव्यतिरीक्त सलमानवर हम साथ साथ है चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी काळवीटाची शिकार करण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सलमानचे वकील एच.एम. सारस्‍वत म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी स्वतःला आंतरराष्ट्रीय गँगस्टर म्हणवणा-या एका व्यक्तिने मला फोन केला. न्यायालयात सलमानची बाजू मांडल्याने आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याची निर्दोष सुटका झाल्यामुळे गँगस्टरने धमकी दिली आहे. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानची निर्दोष मुक्तता झाल्याने मी खूश नाही. याप्रकरणी परिणामांना सामोरं जाण्यास तयार राहा आणि यातून तुझी कोणीच सुटका करू शकत नाही, असे तो गँगस्टर म्हणाल्याचे सारस्वत यांनी सांगितले. एच.एम. सारस्‍वत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्यांना सशस्त्र सुरक्षा देण्यात आली आहे. आम्ही सारस्वत यांना सशस्त्र पोलिसांची सुरक्षा दिली आहे. तसेच, याप्रकरणी तपास करण्यासही सुरुवात केलीय, असे पोलीस आयुक्त अशोक राठोड यांनी सांगितले.

१९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप होता. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ ऑक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची जामीनावर सुटका झाली होती. २००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटाची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. काळवीटची शिकार करणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर अशा विविध कलमांखाली सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजस्थान हायकोर्टाने गेल्यावर्षी जुलैमध्ये सलमानची काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती. कोर्टाने सलमान खानच्या परदेशवारीवर निर्बंध घातले होते. मात्र राजस्थान सरकारने याविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khans lawyer gets death threat from international gangster

ताज्या बातम्या