अभिनेता मनोज वाजपेयी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन २’ ही वेब सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजच्या माध्यमातून सुपरस्टार नागार्जुनची सून समांथाने हिंदीमध्ये पदार्पण केले. पण तिने सीरिजमध्ये साकारलेली भूमिका तिच्यासाठी आव्हानात्मक होती. ती भूमिका साकारताना समांथाने अनेक गोष्टींचा विचार केला होता.

‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजमध्ये समांथाने राजी या क्रूर शत्रूची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना समांथा म्हणाली, ‘प्रेक्षकांनी मला नेहमीच एक क्यूट गर्ल म्हणून पाहिले आहे. ही भूमिका साकारताना मी विचार केला होता एक तर ही भूमिका प्रचंड फ्लॉप ठरले किंवा लोकांना प्रचंड आवडेल. हे माझ्या कामावर अवलंबून होते. माझ्यासाठी ते खूप भीतीदायक आणि धोकादायक होते.’

PHOTOS: नागार्जुनची सून अभिनेत्री समांथा अक्किनेनीचे क्लासिक घर, पाहा आतून कसे दिसते

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

त्यानंतर समांथाने तिची भूमिका सर्वांना प्रचंड आवडली असल्याचे सांगितले. ‘माझ्या भूमिकेची प्रशंसा करण्यासाठी कुणी मला फोन करावा अशी मी आशा बाळगत नाही. पण सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर मला अशा लोकांनी फोन केले ज्यांच्या फोनची मी कधी अपेक्षाही केली नव्हती’ असे समांथा म्हणाली.

काय आहे सीरिजची कथा?

दिल्लीला गॅस अटॅकपासून वाचवल्यानंतर श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी)ने ‘टास्क फोर्स’मध्ये काम करणे सोडून दिले. आता श्रीकांत एका आयटी कंपनीमध्ये ९ ते ५ या वेळात काम करताना दिसतो. तसेच आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तो पत्नी सुचिला (प्रियमणि) खूश करण्यासाठी स्वयंपाक देखील करताना दिसत आहे. पण हे सगळं करताना श्रीकांत कंटाळलेला असतो आणि त्याला पूर्वीसारखे काही अॅडवेंचरस करायचे असते. दुसरीकडे श्रीकांतला जे.के. तळपदे (शारिब हाश्मी) ‘टास्क फोर्स’मधील अपडेट देत असतो आणि सतत त्याला पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगत असतो. अखेर रोजच्या आयुष्याला कंटाळलेला श्रीकांत पुन्हा ‘टास्क फोर्स’मध्ये काम करण्यास सुरुवात करतो आणि इथून कथा पूर्णपणे बदलून जाते. सीरिजची कथा चेन्नई, मुंबई, उत्तर श्रीलंका, लंडन अशा विविध ठिकाणांभोवती फिरत आहे. दरम्यान श्रीकांतला राजी (समांथा अक्किनेनी) या क्रूर शत्रूचा सामना करावा लागतो.