दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा आणि पती नागा चैतन्यची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सध्या त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत की हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्यात आलेल्या या दुराव्यामुळे चाहते दु: खी आहेत, कारण या बातमीमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्या दोघांच्या चाहत्यांची फक्त एकच इच्छा आहे की ते दोघे लवकरच एकत्र आले पाहिजेत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. मात्र, या दोघांनीही अद्याप या विषयी कोणतीही माहिती दिली नाही. ‘एशियानेट न्यूजएबल’ने त्यांच्या अहवालात पंडित जगन्ना गुरुजींचे भाकीत सांगितले आहे, ‘दोघांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये खूप फरक आहे. तर नागाचे लक्ष हे जास्त त्याच्या कुटुंबाकडे आहे आणि समांथा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

तर, ज्योतिषांनी असे देखील सांगितले आहे की, ‘त्या दोघांच्या नात्यात आलेल्या तणावाचे कारण करिअर देखील असू शकते. याशिवाय, कुटुंबामुळे ही त्यांच्यत तणाव निर्माण झाला असेल. जर समांथा आणि नागामध्ये असलेल्या मतभेदांमध्ये कुटुंबाने वेळीच हस्तक्षेप केला असता तर हे सहज सोडवता आले असते. त्यांना मुलं देखील नाहीत, मुलं असती तर त्यांनी विभक्य होण्यावर पुन्हा विचार केला असता. त्यामुळे आता हे दोघे विभक्त होण्याची शक्यता आहे.’

आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंडित जगन्नाथ पुढे म्हणाले, ‘नागा आणि समांथा दोघेही हुशार आहेत. कोणीही घाईने एवढा मोठा निर्णय घेणार नाही. ते वेगळे होण्यावर अधिक भर देत आहेत हे जाणून सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, अशा ही चर्चा आहेत की त्या दोघांना या सगळ्या गोष्टी मागे टाकत एकत्र पुढे जाण्याची इच्छा आहे.