गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल चर्चेत आहे. तिने पतीसोबतचा फोटो शेअर करत आई होत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. यावर काजलने एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला सुनावले आहे. तिच्या याच पोस्टवर समांथाने कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.
काजलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुबईमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने ‘सध्या मी माझ्या आयुष्यातील एकदम नव्या आणि आश्चर्यकारक फेजमधून जात आहे. माझ्या शरीरात होणारे बदल, माझे घर आणि माझ्या कामाच्या ठिकाणी होणारे बदल या सर्व गोष्टींना मी समोरीज जात आहे. याशिवाय, काही कॉमेंट्स, बॉडी शेमिंग करणारे मेसेजेस, मीम्स खरोखरच यासाठी मदत करत नाहीत. थोड दयाळूपणे वागायला शिकूया. हे जर फार कठिण असेल तर जगा आणि जगू द्या’ या आशयाचे कॅप्शन देत ट्रोलर्सला सुनावले आहे.
आणखी वाचा : अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा अपघात
काजलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. त्यामधील दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने कमेंटमध्ये ‘तू आताही सुंदर आहेस आणि नेहमीच सुंदर राहशील’ या आशयची कमेंट समांथाने केली आहे.

काजल आणि गौतम यांनी ३० ऑक्टोबर २०२० रोजी लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. काही कलाकारांनी देखील त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. काजल आणि गौतम जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ती पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसते.