अभिनेत्री समांथा रुथ प्रभू विशेष चर्चेत आली ते तिने अभिनेता नागा चैतन्यबरोबर घेतलेल्या घटास्फोटामुळे. समांथा व नागा चैतन्य यांनी ६ ऑक्टोबर २०१७ साली लग्न केलं; पण लग्नाच्या काही वर्षांनंतर या जोडीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि २०२१ साली त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करीत घटस्फोटाची घोषणा केली.
सोशल मीडियावरही या दोघांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसली. एकमेकांपासून वेगळं झाल्यानंतर दोघे एकमेकांबद्दल फारसं बोलताना दिसले नाहीत. समांथा रुथ प्रभूच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरूबरोबर तिच्या डेटिंगच्या अफवांना पुन्हा उधाण आलं आहे. समांथा सोशल मीडियावर शूटिंग व विविध इव्हेंटचे फोटो शेअर करीत असते.
समांथानं शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोमध्ये अभिनेत्री राज निदिमोरू आणि शुभमच्या टीमबरोबर चित्रपटाच्या बॅनरसमोर पोज देताना दिसत आहेत. पण दुसऱ्या फोटोत समांथा राजच्या खांद्यावर डोके ठेवून फ्लाइटमध्ये आरामात सेल्फी काढत आहे. या फोटोंमुळे दोघांच्याही डेटिंगच्या अफवा पुन्हा एकदा पसरल्या आहेत. दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही पुष्टी केलेली नाही. या फोटोंमुळे राज व समांथा डेट करीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
फोटो शेअर करताना समांथाने कॅप्शनमध्ये लिहिले, “आमच्याबरोबर शुभम पाहिल्याबद्दल धन्यवाद! शुभमबरोबर प्रवास सुरू झाला आहे आणि किती छान सुरुवात झाली आहे!”
समांथा आणि राज निदिमोरू यांच्या व्यावसायिक सहवासाची सुरुवात ‘द फॅमिली मॅन सीझन २’ पासून झाली. या सीरिजमध्ये तिने राजीची भूमिका साकारली होती. ते ‘सिटाडेल : हनी बनी’ या भारतीय स्पिन-ऑफसाठी पुन्हा एकत्र आले. ‘ब्रह्मांड’ आणि ‘द फॅमिली मॅन सीझन ३’मध्ये पुन्हा एकत्र काम करण्याची अपेक्षा आहे. या सर्वांमध्ये दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा आहेत. दोघांनीही याबद्दल मौन बाळगले आहे. समांथाचे आधी अभिनेता नागा चैतन्यशी लग्न झाले होते; परंतु २०२१ मध्ये दोघे वेगळे झाले. चैतन्यने जवळजवळ दोन वर्षे डेट केल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी अलीकडेच लग्न केले.