दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अभिनेत्री समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलंय. त्यांच्या या निर्णयानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दोघांनी घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाणं आलं होतं. समांथा एका डिझायनरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत असतानाच समांथाने एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पुर्णविराम लावला होता.

दरम्यान समांथा रुथ प्रभूचा स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरला नागा चैतन्यच्या काही चाहत्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. समांथा आणि प्रीतम एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरू लागल्यानंतर प्रीतमला या धमक्या येऊ लागल्या आहेत.

“लोकांना ‘अशा’ फिगरच्या महिला आवडतात”, नोरा फतेहीचा धक्कादायक खुलासा

प्रतीम हा समांथाचा फक्त स्टायलिस्टत नाही तर तिचा जवळचा मित्र देखील आहे. समांथा आणि नागा चैतन्यच्या विभक्त होण्याच्या निर्णयानंतर अनेक अफवा पसरू लागल्या. यातच प्रीतम आणि समांथामधील जवळीक ही समांथा आणि नागा चैतन्यच्या विभक्त होण्याचं कारण असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. तर काही युट्यूबरने समांथासोबत प्रीतमचे संबध असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानंतर प्रीतमला अनेक धमक्या येऊ लागल्या आहेत.

नेहा धुपियाने शेअर केला बाळासोबतचा पहिला फोटो, खास पोस्ट शेअर करत डॉक्टरांचे मानले आभार

काही दिवसांपूर्वीच प्रीतमने “महिलांवरील हिंसा” अशी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे देखील तो चांगलाच चर्चेत आला होता. अनेक नेटकरी प्रीतमला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. तर दुसरीकडे समांथाच्या चाहत्यांनी प्रीतमला पाठिंबा दिलाय. प्रीतम कायम समांथाला जीजी म्हणजेच बहिण म्हणून हाक मारतो. असं चाहते म्हणाले आहेत.

दरम्यान या प्रकरणामुळे आता सोशल मीडियावर समांथा आणि नागा चैतन्यच्या चाहत्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.