अभिनेत्री समीरा रेड्डी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समीरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. समीराने आई झाल्यानंतर तिने अभिनयाकडे पाठ फिरवली. ती सध्या तिच्या संपूर्ण कुटुंबाकडे लक्ष देण्यात व्यस्त आहे. समीराने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या वजन कमी करण्याबद्दल सांगितले आहे.
समीर रेड्डीने एक दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने फिट टू फॅट ट्रान्सफॉर्मेशनचा एक फोटो शेअर केला आहे. यात समीराने तिचे ११ किलो वजन कसे कमी केले, तसेच ती फिट कशी झाली, याबद्दलची माहिती दिली आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने तिचा पूर्वीचा एक फोटो आणि आताचा एक फोटो कोलाज केला आहे. यात समीराचा फिट लूक पाहायला मिळत आहे. समीराने काही दिवसांत अनेक किलो वजन कमी करत स्वतःला पुन्हा फिट बनवलं आहे.
समीरा रेड्डीने नुकतंच तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल पोस्ट केली आहे. यात ती म्हणाली, “एका वर्षापूर्वी मी फिटनेसला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी माझे वजन ९२ किलो होते. आज माझे वजन ८१ किलो झाले आहे. वजन कमी करण्यापेक्षा मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की यामुळे मला ऊर्जा पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.”
समीरा रेड्डीचे वजन कशाप्रकारे कमी झाले? याच्या काही टिप्सही तिने तिच्या चाहत्यांना दिल्या आहेत.
१. माझे लक्ष कमी व्हायचे पण मी स्वतःला पुन्हा जागृत केले आणि पुन्हा त्या ट्रॅकवर यायची.
२. मला रात्री उशिरा स्नॅक्स खाण्याची सवय आहे. पण आता उपवासामुळे मला खूप फायदा झाला आहे.
३. मी नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते.
४. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक खेळ देखील निवडा. हे तुम्हाला फिटनेससह मजेशीर प्रवास करण्यास मदत करते.
५. तुमचा फिटनेस प्रवास मित्र किंवा जोडीदारासोबत तपासत राहा आणि त्यावर सतत काम करत राहा.
घरबसल्या IPL लिलावाचा आनंद घेण्यासाठी प्रिती झिंटा सज्ज, बाळाला कुशीत घेतल्याचा फोटो शेअर म्हणाली…
दरम्यान, समीराने २००२ मध्ये सोहेल खान सोबत ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. समीराने हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. समीराने २०१४ मध्ये बिजनेसमॅन अक्षय वर्देशी लग्न केले. त्यांच्या मुलाचे नाव हे हंस आणि मुलीचे नाव नायरा आहे.