मराठा मंदिर कला केंद्र, कला विकास परिषद, पं. भीमसेन जोशी म्युझिक फाऊंडेशन, ‘गदग’ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ डिसेंबर रोजी मुंबईत एका संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत सभेत संजीव सिन्हा व नीता सिन्हा यांची गिटार जुगलबंदी व माधवी नानल यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
उपरोक्त संस्थांतर्फे लवकरच पं. भीमसेन जोशी, पं. रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खाँ आणि पं. सुब्बालक्ष्मी या चार भारतरत्न विजेत्यांच्या स्मृतीनिमित्त ‘संगीत भारती’ या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. त्याबाबतची माहितीही या वेळी सांगण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम मराठा मंदिरचे श्रीमंत जिवाजीराव शिंदे सभागृह, मुंबई सेंट्रल येथे दुपारी १२ वाजता होणार असून कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश आहे.