संजय दत्तचे मुलगी त्रिशालाबरोबर व्हिडिओ चॅट

मुंबई बॉम्बस्फेटप्रकरणी पुण्यातील येरवडा कारागृहात कारावासाची शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ३० दिवसाच्या पॅरोल रजेवर घरी परतला आहे.

मुंबई बॉम्बस्फेटप्रकरणी पुण्यातील येरवडा कारागृहात कारावासाची शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ३० दिवसाच्या पॅरोल रजेवर घरी परतला आहे. मुलीच्या नाकावरील शस्त्रक्रियेसाठी त्याला ही रजा मिळाली आहे. घरी परतलेल्या संजयची आनंदी छबी बुधवारपासून माध्यमातून सर्वत्र फिरत असतानाच आता मोठी मुलगी त्रिशालाबरोबर व्हिडिओ चॅट करतानाचे छायाचित्र महाजालावर अढळून आलं आहे. न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असलेल्या त्रिशालाने वडिलांबरोबर व्हिडिओ चॅट करतानाचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, आपण वडिलांना सेल्फी काढायला शिकवल्याचंदेखील तिनं छायाचित्रासोबतच्या संदेशात म्हटलं आहे. छायाचित्रातील पिता आणि कन्येच्या चेहऱ्यावरील आनंद नजरेत भरण्यासारखा आहे. संजय दत्तचे अभिनेत्री रिचा शर्माबरोबर लग्न झाले होते. रिचाचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्रिशाला ही संजय दत्त आणि रिचाची मुलगी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay dutt video chats with eldest daughter trishala

ताज्या बातम्या