दिग्दर्शनातील ‘परफेक्शन’ म्हणजे काय असते ही बाब संजय लीला भन्साळी यांच्याहून उत्तम कोणीच सांगू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात काही अशा असामान्य गोष्टींची झलक पाहायला मिळते ज्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. भन्साळींच्या चित्रपटाचे सेट जितके भव्य असतात तितकीच त्यांच्या चित्रपटातील पात्रं प्रभावी असतात. ‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ अशा एकामागोमाग एक तीन चित्रपटांसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यासोबत काम केल्यानंतर आता या तिघांमध्ये चांगल्या मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे. रणवीर आणि दीपिकाच्या अभिनय कौशल्याचे स्वत: भन्साळीदेखील चाहते आहेत, म्हणूनच आता आगामी चित्रपटासाठीही त्यांना नायिका म्हणून दीपिकाच हवी आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार हा चित्रपट ऐतिहासिक कथानकावर आधारित नसून कॉमेडी असल्याचं म्हटलं जात आहे. त्याची पटकथा भन्साळींकडे तयार असून दीपिकाने होकार दिल्यास पुन्हा एकदा हे दोघे एकत्र काम करण्यास सज्ज होतील. दीपिकाच्या चाहत्यांनाही तिला एका वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत पाहायला आवडेल यात काही शंका नाही.

वाचा : …म्हणून आमिर त्याच्या चित्रपटांसाठी मानधन आकारत नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भन्साळींच्या या आगामी चित्रपटात दीपिकासोबतच इतर कोणकोणते कलाकार असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भन्साळींकडून अधिकृत घोषणेनंतरच याबाबत सर्व माहिती स्पष्ट होईल. दरम्यान, पाठीच्या कणाच्या दुखापतीमुळे दीपिका सध्या कोणतीच शूटिंग करत नसून व्यग्र वेळापत्रकातून ती काही काळ विश्रांती घेणार असल्याचं समजतंय.