मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी गौरवण्यात येते. यंदाचे पुरस्कार जाहीर झाले असून या वर्षी ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि डॉ. विलास उजवणे यांना प्रदान करण्यात येणार आहे तर नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोट्या सावंत यांना ‘कर्मयोगी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्यतिरिक्त अन्य मान्यवरांनीही यावेळी त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहेत. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत यंदाचा ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२२’ येत्या ७ जून रोजी मुंबईत होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, अन्न नागरिक पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह राजकारणातील, कलासृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanskrutik kaladarpan gaurav rajani 2022 usha nadkarni got award for her contribution in entertainment industry mrj
First published on: 04-06-2022 at 15:48 IST