सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे. करण जोहरच्या आगामी सिनेमातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सध्या बॉलिवूडच्या या नवीन चेहऱ्यांमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती सारा अली खानचीच. करिना कपूर तिला फॅशनचे खास धडे देते म्हटल्यावर सारा सगळ्यांमध्ये उठून दिसणारच ना..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करिना कपूर खानच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सारानेही हजेरी लावली होती. साराने काळ्या रंगाचे शर्ट, शॉर्ट पॅन्ट आणि गुडघ्यापर्यंतचे बूट घातले होते. कमीत कमी मेकअप आणि फॅशन करुनही ती सर्वांमध्ये खुलून दिसत होती. करिनाच्या या पार्टीला साराशिवाय करिष्मा कपूर, करिष्माचा कथित प्रियकर संदीप तोष्नीवाल, मलायका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान आणि कुणाल खेमुही उपस्थित होते.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये सध्या सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी साराच्या बॉलिवूड पदार्पणाची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. साराने तिच्या अभिनयाची सुरुवात करण जोहरच्या दिग्दर्शनात करावी, अशी करिना कपूरची इच्छा आहे. मात्र करिनाच्या हा विचार सैफला मात्र अजिबात रुचलेला दिसत नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करणच्या सिनेमातून साराने पदार्पण करु नये, असे सैफला वाटते. करणसोबत काम करुन साराचा प्रवास हा आलियासारखा होईल, अशी सैफला भीती आहे. याची खबरदारी म्हणूनच सैफ अली खान सारा च्या पदार्पणाबद्दल सजगता दाखवित असल्याचे दिसते. बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहरने आलियाला लॉन्च केल्यानंतर बऱ्याचदा तिच्या सिनेमाबाबत तो हस्तक्षेप करताना दिसला आहे. त्याच्यासोबत सिनेमा केल्यास साराची अवस्था देखील आलिया सारखी होईल, असे सैफला वाटते.

सैफ अली खान, अमृता अरोरा आणि मलायका अरोरा

करिष्मा कपूर आणि तिचा तथाकथित प्रियकर संदीप तोष्णिवाल हे देखील या पार्टीला उपस्थित होते.

करिनाची गँग

सेल्फी प्लीज….

रणवीर सिंगच्या सिनेमातून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रणवीर आणि सारा ‘गुल्ली बॉय’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. जोया अख्तर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सारा या सिनेमात रणवीरसोबत  दिसणार असल्याची चर्चा रंगली होती. यापूर्वी  सारा अली खान हृतिक रोशनसोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या सिनेमाची निर्मिती करण जोहर करणार तर या सिनेमाचे दिग्दर्शन ‘अग्निपथ’चा दिग्दर्शक करण मल्होत्रा करणार असल्याची वृत्त झळकले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan looks super hot steals the show at kareena kapoor saif ali khan party
First published on: 03-03-2017 at 16:32 IST