अभिनेता कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खानवर निशाणा साधला आहे. तिच्या एका फोटोची खिल्ली उडवत घरातील फाटके कपडे या मुलीला द्या अशी विनंती त्याने नेटकऱ्यांना केली आहे.

अवश्य पाहा – पहिल्याच आठवड्यात ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस’मधून बाहेर

केआरकेने साराचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचं टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे साराने घातलेली जिन्स काही ठिकाणी फाटलेली दिसत आहे. खरं तर अशा फाटलेल्या जिन्स हल्ली फॅनश म्हणून वापरल्या जातात. परंतु या जिन्सवरुनच केआरकेने साराची खिल्ली उडवली आहे. “घराची साफ सफाई करताना तुम्हाला काही जुने फाटलेले कपडे सापडले तर ते टाकू नका. हे कपडे सारासारख्या लोकांना भेट द्या.” अशा आशयाचं ट्विट त्याने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

शेतकरी आंदोलन : कंगनाला ते ट्विट करणं पडलं भारी; कर्नाटक पोलिसांनी दाखल केला गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी केआरकेने अक्षय कुमारवर देखील टीका केली होती. अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी त्याने केली होती. “देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचं प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा. म्हणावं हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही.” अशा आशयाचं ट्विट त्याने केलं होतं.