बॉलिवूडचे प्रयोगशील दिग्दर्शक प्रकाश झा यांचा येऊ घातलेला ‘सत्संग’ चित्रपट असाराम बापूवर बेतला असल्याची सध्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चा ऐकून ‘सत्संग’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश झा काहिसे भयचकित झाले आहेत.
“मी आसाराम बापूवर कोणताही चित्रपट बनवत नाही. मलाच कळत नाही ‘सत्संग’ विषयी ही चर्चा कशी व कोणी सुरू केली. एखाद्या विषयावर जर अशा चर्चा सुरू असतील तर त्या विषयावर लगेच चित्रपट बनवने ही काही चांगली बाब नाही. आणि ‘सत्संग’ कोण्या स्वयंघोषीत साधू विषयी मुळीच नाही,” असे प्रकाश झा म्हणाले.
उलटसूलट चर्चांनंतर प्रकाश झा काही बोलेना झाल्यावर झा ‘सत्संग’ चित्रपट करत नसल्याच्या वावड्या उठल्या आहेत.
“एखाद्या ठराविकच विषयावर चित्रपट करणारे प्रकाश झा यांना आता या प्रकारच्या चित्रपचांपासून बाजूला जायचे असल्याचे व काहीतरी वेगळाच चित्रपट करायचा आहे,” असे सूत्रांनी सांगितले.
प्रकाश झा यांनी याआधी अजय देवगन व काजोल सोबत ‘दिल क्या करे’ हा वेगळ्या हातोटीचा चित्रपट केला होता. मात्र, ‘दिल क्या करे’ चित्रपट चांगलाच आपटला होता.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2013 रोजी प्रकाशित
‘सत्संग’चा आसारामशी संबंध नाही – प्रकाश झा
बॉलिवूडचे प्रयोगशील दिग्दर्शक प्रकाश झा यांचा येऊ घातलेला 'सत्संग' चित्रपट असाराम बापूवर बेतला असल्याची

First published on: 09-10-2013 at 05:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satsang is not about asaram bapu prakash jha