बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. अश्लिल चित्रपट निर्मितीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला आणखी एक धक्का बसला आहे. सेबीने शिल्पा शेट्टीला ३ लाखांचा दंड ठोठावला आहे. ट्रेडिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्याच आल्याचं सांगण्यात आलं आहे. राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, रिपु कुंद्रा आणि त्यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीच्या नियमांच उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

२० जुलैला राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणी राज कुंद्र आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचं उघड झालंय. तर राज कुंद्राची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.

पॉर्न रॅकेट प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज मुंबईच्या कोर्टाने फेटाळला आहे. यापूर्वी मंगळवारी कोर्टाने राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रांचा सात दिवसांचा पोलीस रिमांड मागितला होता. मात्र, कोर्टाने तिसऱ्यांदा रिमांड मंजूर करण्यास नकार दिला.

Video: आत्मनिर्भर..! ८०व्या वर्षीही कष्ट करून स्वत:च्या पायावर उभी असणारी आजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज कुंद्रा यांचा अश्लील चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग घेत होता, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई क्राइम ब्रँचनेही राज कुंद्रा यांच्या विरोधात ठोक इलेक्ट्रॉनिक पुरावे असल्याचा दावा केला आहे. पॉर्न फिल्मच्या बदल्यात व्यवहार केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांनाही मिळाले आहेत. त्याचबरोबर, अंमलबजावणी संचालनालय देखील या प्रकरणात सक्रिय झाले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी पॉर्न फिल्मच्या निर्मितीपासून आणि त्यांच्या ऑनलाइन रिलीजमधून गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान किमान १.२५ कोटी रुपये कमावले.