‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) या वर्षी बंगाली चित्रपटसृष्टीतील विख्यात दिग्दर्शक व अभिनेत्री अपर्णा सेन आणि प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. याशिवाय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा एस. डी. बर्मन पुरस्कार प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना जाहीर करण्यात आला आहे. महोत्सवाचे संचालक व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘पिफ’चा उद्घाटन सोहळा येत्या गुरुवारी (१२ जानेवारी) कोथरूड सिटीप्राईड चित्रपटगृहात होणार आहे. या वेळी हे पुरस्कार प्रदान केले जातील. दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिफ बझारमध्ये साकारणार ‘ओम पुरी  रंगमंच’ साकारण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपर्णा सेन या अभिनेत्री, दिग्दर्शक आणि पटकथालेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सत्यजित रे यांचा १९६१ मध्ये आलेला ‘तीन कन्या’ हा अपर्णा सेन यांचा सुरुवातीचा चित्रपट. दिग्दर्शनात ‘३६ चौरंघी लेन’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या चित्रपटांसाठी अपर्णा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अभिनेत्री सीमा देव यांनी राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीवर’ (१९६१) या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ‘सुवासिनी’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी चित्रपटरसिकांची दाद मिळवली. तर उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबलावादनातील आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीसह संगीतकार म्हणूनही जगभरात आपला ठसा उमटवला. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात यंदा स्पेनमधील प्रसिद्ध ‘फ्लॅमेंको’ नृत्याचे सादरीकरण होणार आहे, तर उद्घाटनानंतर दिग्दर्शक बार्बरा एडर यांचा ‘थँक यू फॉर बाँबिंग’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानात युद्धाच्या पाश्र्वभूमीवर बातमीदारी करणाऱ्या तीन बातमीदारांची ही कथा आहे.

याशिवाय स्पर्धात्मक विभागात निवड झालेल्या मराठी चित्रपटांची घोषणा देखील आज करण्यात आली. हे चित्रपट खालीलप्रमाणे –

डॉक्टर रखमाबाई – दिगदर्शक – अनंत नारायण महादेवन
लेथ जोशी – दिगदर्शक- मंगेश जोशी
व्हेंटीलेटर – दिगदर्शक – राजेश मापुस्कर
एक ते चार बंद – दिगदर्शक – अपूर्वा साठे
दशक्रिया – दिगदर्शक – संदीप भालचंद्र पाटील
घुमा – दिगदर्शक – महेश रावसाहेब काळे
नदी वाहते – दिगदर्शक – संदीप सावंत

यावर्षी १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरणार असून पुणे आणि पिंपरीचिंचवड शहरा आठ ठिकाणी १३ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट पाहता येणार आहे. यामध्ये सिटी प्राईडकोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड आर – डेक्कन, मंगला मल्टिप्लेक्स, आयनॉक्सबंडगार्डन रस्ता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि चिंचवड येथील कार्निव्हल सिनेमा व आयनॉक्स या चित्रपट गृहांचा समावेश आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seema devi and aparna sen piff life achievements award
First published on: 09-01-2017 at 23:09 IST