MDK Chief and Actor Vijayakanth Dies at 71 : डीएमडीके पक्षाचे संस्थापक, राजकीय नेते आणि लोकप्रिय तमिळ अभिनेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे. गुरुवारी (२८ डिसेंबर रोजी) चेन्नईमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, नंतर ते व्हेटिंलेटर सपोर्टवर होते. ते ७१ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून लवकरच डीएमडीके कार्यालयात नेण्यात येणार आहे.

त्यांच्या निधनाच्या एक दिवसाआधी पक्षाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करून विजयकांत यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. विजयकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे, असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Konkona Sen Sharma Amol Parashar Dating rumors
घटस्फोटानंतर सात वर्षांनी लहान अभिनेत्याला डेट करतेय बॉलीवूड अभिनेत्री, पहिल्या पतीने पोस्ट शेअर करत लिहिलं…
Arun Govil Hema Malini BJP Rajput anger Uttar Pradesh
हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबासह ख्रिसमस साजरा केला आणि नंतर केली आत्महत्या, घटनेमुळे खळबळ

“थिरू विजयकांतजी यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. तमिळ चित्रपट जगतातील एक अभिनेते ज्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली. एक राजकीय नेते म्हणून ते सार्वजनिक जीवनात लोकांच्या सेवेसाठी अत्यंत वचनबद्ध होते. त्यांच्या कामाचा तामिळनाडूच्या राजकीय परिस्थितीवर प्रभाव पडला. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून निघणं शक्य नाही. ते माझे जवळचे मित्र होते. मागच्या काही वर्षांत माझा त्यांच्याशी झालेला संवाद मला आठवत आहे. या दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांबरोबर माझी सहानुभूती आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘कॅप्टन’ म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे विजयकांत यांची प्रकृती याआधी नोव्हेंबरमध्ये बिघडली होती. त्यावेळी त्यांना चेन्नईच्या एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खोकला आणि घसादुखीने त्रस्त असल्याने ते १४ दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होते. त्यानंतर ते बरे झाले होते. पण आता पुन्हा प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

विजयकांत हे लोकप्रिय तमिळ अभिनेते होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी १५४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. नदीगर संगम म्हणजेच दक्षिण भारतीय कलाकारांची संघटना (SIAA) मध्ये पदावर असताना त्यांनी दक्षिण चित्रपट उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणले होते. अभिनयाबरोबरच त्यांनी केलेल्या कामांमुळेही ते लोकप्रिय होते. त्यांनी २००५ मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळगम नावाच्या पक्षाची स्थापना केली होती.

२००६ मध्ये त्यांच्या पक्षाने विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवली आणि एकूण मतदानाच्या १० टक्के मतं मिळविली. मात्र, त्यांच्याशिवाय पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. २०११ मध्ये डीएमडीकेने एआयडीएमकेनेबरोबर युती करून निवडणूक लढवली आणि ४१ जागांपैकी २६ जागा जिंकल्या होत्या. त्या वर्षी त्यांचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला होता. विजयकांत यांनी २०११ ते २०१६ पर्यंत तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं होतं.