बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांची लेक सुहाना खान नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. सुहाना खान ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच सुहाना खानने तिच्या कॉलेजच्या दिवसांमधील काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहे. तिची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

सुहाना खानने काही तासांपूर्वी तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. यात तिच्यासोबत तिच्या काही मैत्रिणी असल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटो विविध पार्टीमधील असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहे. या फोटोमध्ये सुहाना तिच्या मैत्रिणींसह छान मजा मस्ती करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे.

सुहानाने हा फोटो शेअर करताना त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. माझ्या कॉलेजच्या काळातील काही जुने फोटो, असे तिने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच त्यासोबत तिने एक रडणारा इमोजीही शेअर केला आहे. तिच्या या कॅप्शनवरुन ती तिच्या कॉलेजमधील मैत्रिणींना आणि कॉलेजच्या दिवसांना आठवत असल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत.

जबरदस्त अ‍ॅक्शन, भन्नाट केमिस्ट्री; अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चा टीझर पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुहाना खान चित्रपट निर्माती झोया अख्तरच्या ऑफिस बाहेर दिसली होती. यानंतर ती लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. झोया अख्तर ‘आर्ची’ या आंतरराष्ट्रीय कॉमिक बुकच्या भारतीय रूपांतरावर आगामी चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर देखील दिसणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.