बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे सध्या प्रसारमाध्यमांना टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. वांद्रे येथील आपल्या मन्नत या अलीशान घराबून बाहेर पडताना ते अनेकदा आपण कोणाच्या नजरेस येणार नाही याची काळजी घेताना दिसतात. शाहरुख आणि गौरी यांचा मोठा मुलगा आर्यन खानला २ ऑक्टोबरच्या रात्री अमलीपदार्थ विरोधी पथक म्हणजेच एनसीबीने क्रूझवरील रेव्ह पार्टीमधून अटक केल्यापासून शाहरुख आणि गौरी बेचैन असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिलीय. दोघेही खचून गेले असून ते असाहाय्य झालेत. बॉलिवूड लाइफ डॉटकॉमला दिलेल्या माहितीनुसार शाहरुख हा सध्या स्वत:ला असाहाय्य समजत असून तो फार खचून गेलाय असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शाहरुख सध्या फारच दु:खात आहे. मात्र त्याचवेळी तो फार संतापलेल्या अवस्थेत आहे. तो नेहमीप्रमाणे जेवतही नसून पुरेशी झोपही घेत नाहीय. तो एखाद्या असहाय बापाप्रमाणे झालाय,” असं शाहरुखच्या एका जवळच्या मित्राने या वेबसाईटला सांगितलं आहे.

न्यूज १८ ने यापूर्वीच दिलेल्या वृत्तानुसार शाहरुखने यापूर्वीच त्याच्या पठाण चित्रपटाचं शुटींग पुढे ढकललं आहे. तसेच अटली या दक्षिणात्य दिग्दर्शकासोबतच्या नयनतारा या चित्रपटाचं शुटींग अनिश्चित कालासाठी स्थगित केलं आहे. शाहरुख हा सध्या कणखर असल्याचं आपल्या निर्णयांमधून दाखवत असला तरी तो फार तणावाखाली असल्याचं काही मनोरंजन सृष्टीमधील साईट्सने म्हटलं आहे.

आर्यनचा अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला
दरम्यान, आर्यन खानचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळून देण्यात आलाय. क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नसताना त्याला कोठडीत ठेवणे उचित नाही. असे करून त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य पणाला लावले जात आहे. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांनी सोमवारी विशेष सत्र न्यायालयात केली होती. जामीन अर्जावर तातडीने सुनावणीची आवश्यकता नसल्याचे सांगत अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी आठवडय़ाची वेळ देण्याची मागणी एनसीबीतर्फे करण्यात आली. न्यायालयाने मात्र प्रकरणावरील सुनावणी बुधवारी ठेवत एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.

आर्यनला अटक झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला मन्नतमध्ये जाऊन भेट घेतलीय. यामध्ये सलमान खान, करण जोहर यासारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच गौरी खानचा भाऊ विक्रम सुद्धा मन्नतच्या बाल्कनीमध्ये दिसला होता.

शाहरुखचा मुलगा आर्यन याला या प्रकरणानंतर अभिनेता ऋतिक रोशन, हंसल मेहता, पुजा भट्ट, रविना टंडन यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल नेटवर्किंगवरुन पाठिंबा दर्शवलाय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan feeling helpless and broken with son aryan khan in arthur road jail report scsg
First published on: 12-10-2021 at 10:49 IST