क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास १५ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाहीये. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, शाहरुख खान मुलगा आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात केला आहे. त्याचा तुरुंगातून बाहेर पडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हात जोडताना दिसत आहे.

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात मुलाला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा तेथून बाहेर पडताना कैद्यांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना पाहून शाहरुखने हात जोडले आहेत. त्याचा हा हात जोडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आणखी वाचा : “आधी व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच…,” महिमा चौधरीचा धक्कादायक खुलासा

करोना काळात जेलमधील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. व्हिडीओ कॉल ही सुविधा त्यावेळी सुरु करण्यात आली होती. जेणे करुने कैद्यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीयांशी संवाद साधता येईल. पण आता परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले असून नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे. यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खान येणार असल्याची कोणालाही माहिती नव्हती. अचानक सकाळी ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी किंवा मुलगी नव्हती. फक्त खासगी सुरक्षारक्षक त्याच्यासोबत होते. यानंतर नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी आहे त्या गेटमधून शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला. शाहरुख खानने आर्यनला भेटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोहोचला होता. जवळपास १५ ते २० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांसमोर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.