नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. ‘राहुल’ असो किंवा ‘राज’. प्रत्येक रुपात शाहरुखने प्रेमाची नवी समीकरणं उलगडत चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं. त्यामुळे तो कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र सध्या शाहरुख एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणारा शाहरुख बॉलिवूडमध्ये ‘बादशहा’ या नावानेही ओळखला जातो. इतकंच नाही तर अनेकवेळा त्याच्या हजरजबाबीपणामुळे चर्चेत येत असतो. सध्या शाहरुखच्या याच हजरजबाबीपणाचा प्रत्यय एका चाहत्याला आल्याचं पाहायला मिळत आहे.

शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला ट्विटरवर ‘एखाद्या अभिनेत्रीबरोबर ओळख करुन द्या’ असं म्हटलं होतं. चाहत्याचा हा प्रश्न वाचून थक्क झालेल्या शाहरुखने त्याच्या अनोख्या शैलीमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं. ‘स्वत:च काम स्वत: करायला शिका’, असं शाहरुख यावर म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दुसऱ्या एका चाहत्याने त्याचा लकी नंबर सांगत शाहरुखला त्याचा लकी नंबर विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला मजेशीर अंदाजमध्ये शाहरुखने उत्तर देत ‘माझा लकी नंबर फक्त ११ कोटी हाच आहे’, असं सांगितलं. विशेष म्हणजे शाहरुखने ट्विटरच्या माध्यमातून चक्क २० मिनीटे चाहत्यांबरोबर संवाद साधल्याचं पाहायला मिळालं.