बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षीत ‘फॅन’ चित्रपटातील ‘जबरा’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. शाहरुख खान चित्रपटात दाखविण्यात आलेल्या आर्यन खन्ना या सुपरस्टारच्या चाहत्याची भूमिका साकारत आहे. आर्यन खन्नाचा सर्वात मोठा ‘फॅन’ दाखविण्यात आलेला गौरव अर्थात शाहरुख खान ‘जबरा’ या गाण्यात बेधुंद होऊन नाचताना दिसून येतो.
श्रिया पिळगावकर शाहरुखबरोबर झळकणार 
आर्यन खन्नाच्या स्टारडमने गौरववर केलेली जादू या गाण्यातून पाहायला मिळते. आपणच आर्यनचा सर्वात मोठा चाहता असल्याचे गौरव या गाण्यातून दाखवून देताना दिसतो. आर्यन खन्ना या सुपरस्टारसारखे यश प्राप्त करू इच्छिणारा, गल्लीबोळात आणि आर्यनच्या होर्डिंग्जसमोर फ्री-स्टाईल डान्समधून धम्माल करणाऱया २४ वर्षीय ‘फॅन’चा बाज शाहरुखने उत्तमरित्या पेलला आहे.
  संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2016 रोजी प्रकाशित  
 ‘फॅन’मधील ‘जबरा’ गाणे प्रदर्शित, शाहरुखचा हटके डान्स
आर्यन खन्नाच्या स्टारडमने गौरववर केलेली जादू या गाण्यातून पाहायला मिळते.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
 
  First published on:  17-02-2016 at 14:05 IST  
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan is a jabra fan in this new fan anthem watch song