राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी ‘बधाई हो’ चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट खूप गाजला. त्यापूर्वी नीना गुप्ता कामाच्या शोधात होत्या. सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भात पोस्टदेखील लिहिली होती. ‘बधाई हो’च्या यशानंतर प्रसिद्ध निर्माता करण जोहर आणि अभिनेता शाहरुख खान यांनी त्यांना स्वत:चा फोन नंबरदेखील दिला. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी करण आणि शाहरुखला स्वार्थी, फालतू असल्याचं म्हटलं आहे.

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. मसाबाला अभिनेत्री व्हायचं होतं, पण नीना यांनी तिला हे स्वप्न पाहणं सोडून देण्यास सांगितलं. तुझ्याकडे कितीही उत्तम अभिनय कौशल्य असलं तरी तुझ्या दिसण्यावरून बॉलिवूडमध्ये तुला कोणी काम देणार नाही असा सल्ला नीना यांनी तिला दिला होता. तरीसुद्धा एकदा करण जोहर किंवा शाहरुख यांच्याशी बोलून बघावं असा विचार त्यांनी केला.

‘किती स्वार्थी आणि फालतू लोकं आहेत ती. त्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिला पण माझा फोनच त्यांनी उचलला नाही,’ अशी तक्रार त्यांनी या मुलाखतीत केली. ‘तुझं अभिनय कितीही चांगलं असलं तरी ते तुला अभिनेत्री नाही बनवणार. तू हेमा मालिनी किंवा आलिया भट्ट नाही होऊ शकणार,’ असं मुलीला समजावल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मसाबा गुप्ता हे नाव फॅशन इंडस्ट्रीत फार प्रसिद्ध आहे. सोनम कपूर, कंगना रणौत, शिल्पा शेट्टी, अथिया शेट्टी यांसारखे सेलिब्रिटी तिने डिझाइन केलेले कपडे वापरतात.