अभिनेता शाहरुख खानला नुकतेच मुंबईतील विमानतळावर त्याच्या धाकट्या मुलासोबत पाहण्यात आले. विमानतळामध्ये शाहरुखने अब्रामला उचलून घेतले होते. त्यावेळी अब्राम शांत झोपी गेला होता. अब्राम आणि शाहरुखला पाहताच प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांनी लगेचच त्यांचे कॅमेरे या सेलिब्रिटी बाप-बेट्यांचे फोटो काढण्यासाठी वळवले.

या सर्व गोंधळामध्ये गाढ झोपी गेलेला अब्राम काही क्षणांसाठी जागा झाला आणि लगेचच पुन्हा झोपी गेला. प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांची गर्दी पाहता शाहरुखनेही अब्रामची झोप मोड होणार नाही याची चांगलीच काळजी घेतली. त्यावेळी शाहरुख खान दिल्लीला त्याच्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जात होता. हल्ली शाहरुख ज्या ज्या ठीकाणी जातो त्या त्या ठिकाणी त्याच्यासोबत अब्रामही असतोच. काही दिवसांपूर्वी शाहरुख त्याच्या ‘द रिंग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने बुडापेस्ट आणि हंगरी अशा विविध ठिकाणी गेला होता. त्याचवेळी अब्रामही शाहरुखसोबत होता. त्यामुळे सध्यातरी अब्राम आणि शाहरुख एकमेकांपासून जास्त दूर राहात नाहीयेत. पापा शाहरुख त्याच्या चित्रपटांना जितके महत्त्व देत आहे तितकाच वोळ तो अब्रामलाही देत आहे हे तर स्पष्ट आहे.

तुर्तास, किंग खान त्याच्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. शाहरुख खान, आलिया भट्ट आणि कुणाल कपूर यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गौरी शिंदेने केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट प्रथमच स्क्रिन शेअर करत आहेत. २५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

dsc_9625

dsc_9626-1

dsc_9636

dsc_9639