‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय सायंस फिक्शनपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात अभिनेता अमरीश पुरी यांनी ‘मोगॅम्बो’ ही खलनायक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात त्यांनी उच्चारलेले “मोगॅम्बो खुश हुआ” हे वाक्य आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता हे वाक्य बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान उच्चारणार आहे.

अवश्य वाचा – अन् नेहा कक्करनं दिली दोन-दोन हजारांच्या नोटेची भीक

अवश्य वाचा – स्लिम झाली अन् अडचणीत आली; सारा अली खानला नवा ताप

१९८७ साली प्रदर्शित झालेल्या या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘मिस्टर इंडिया २’ असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये शाहरुख खान ‘मोगॅम्बो’ ही खलनायक व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर रणवीर सिंग नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. तो अनिल कपूरने साकारलेली वरुण वर्मा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहे.

अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा

अवश्य वाचा – प्रेम शेअर करा पण ****** करु नका; पुणे पोलिसांकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ची टीप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु आहे. येत्या काळात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती अली अब्बास जफरने टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली.