बॉलिवूडमधील आघाडीचे तीन खान सलमान खान, शाहरूख खान आणि आमीर खान एकाच मंचावर एकत्र आल्यास तो जादूई क्षण कसा असेल, याची अनुभूती घेण्याची अनेकांना इच्छा होती. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या टीव्हीवरील कार्यक्रमाने २१ वर्ष पूर्ण केल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बॉलिवूडमधील हे तीन खान एकत्र येण्याचा सुवर्ण योग जुळून आला. स्टेजवरील त्यांची अदाकारी पाहून चाहत्यांच्या मनात जास्तीची भावना निर्माण झाल्यास नवल ते काय. त्यांच्या अदाकारीने मंचावर चारचांद लागले. पुरस्कार वितरण सोहळ्यातले ठराविक बाजाचे हे नृत्य नव्हते, तर उत्स्फूर्तपणे केलेले नाच होता. तिघांनी मंचावर ‘टॉवेल डान्स’चा आनंद लुटला. आमीर आणि शाहरूखला हा डान्स करताना पाहून बऱ्याच काळापासून त्यांच्या मनात हा डान्स करण्याची सुप्त इच्छा असणार असे जाणवले. सरते शेवटी ‘आप की अदालत’च्या मंचावर हा ‘टॉवेल डान्स’ करण्याचा योग त्यांना लाभला. एकाच टॉवलवर शाहरूख खान, रजत शर्मा, आमीर खान आणि सलमान खानने मिळून नाच केला. या ‘टॉवेल डान्स’मध्ये आघाडी घेतली होती ती शाहरूख खानने. अशाप्रकारची आणखी अदाकारी आमीर, शाहरूख आणि सलमान खानकडून पाहण्याची इच्छा चाहत्यांच्या मनात निर्माण झाली, तर त्यात गैर ते काय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan salman and aamir do the towel dance
First published on: 03-12-2014 at 04:13 IST