बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी आपला मोठा मुलगा आर्यनची सुरक्षा आणि तब्येतीसंदर्भात आता आणखी कडक पालक होताना दिसत आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तब्बल २६ दिवस तुरुंगात जाऊन आला. दरम्यान, शाहरुख आणि गौरी दोघेही चिंतेत होते. आर्यन घरी परतल्यानंतर आता या दोघांनी आर्यनच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ते आता आर्यनला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख आणि गौरीने आता आर्यनसोबत कायम एक पर्सनल बॉडीगार्ड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा बॉडीगार्ड सावलीसारखा आर्यनच्या सोबत असणार आहे. आर्यनसोबत घडलेल्या घडामोडीनंतर आता खान परिवार चांगलाच चिंतेत आहे. आर्यनसोबत जर बॉडीगार्ड असता तर हा सगळा प्रकार घडला नसता असं आता त्यांना वाटत आहे. त्यामुळे शाहरुख आणि गौरीने हा निर्णय़ घेतल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा – ड्रग्ज प्रकरणाचा आर्यन खानला धसका, पूर्वपदावर आणण्यासाठी शाहरुख आणि गौरीची विशेष तयारी

याशिवाय अशीही माहिती मिळत आहे की शाहरुख दिवाळीनंतर आर्यनला मन्नतपासून लांब ठेवण्याचा विचार करत आहे. ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आर्यनला आपला पासपोर्ट कोर्टात जमा करावा लागला आहे. कोर्टाने घातलेल्या अटींनुसार आर्यन कोर्टाच्या परवानगीशिवाय मुंबईतून बाहेर जाऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत शाहरुख आपला मुलगा आर्यनला आपल्या अलिबागच्या फार्महाऊसमध्ये ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे.

शाहरुख आणि कुटुंबासाठी ऑक्टोबर महिना चांगलाच त्रासदायक ठरला. शाहरुख आणि गौरी दोघांचीही अशी इच्छा आहे की आता आर्यन काही काळ माध्यमांच्या नजरेपासून दूर राहावा आणि त्याने स्वतःवर लक्ष केंद्रित करावं. म्हणूनच आर्यनला दिवाळीनंतर अलिबागला पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान, आर्यनच्या अटकेमुळे शाहरुखचं बंद पडलेलं काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यात तो आपलं काम पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे. दिवाळीनंतर काही काळ शाहरुख खान आपल्या परिवारासह अलिबागमधल्या आपल्या फार्महाऊसवर राहणार आहे. त्यानंतर आर्यनला तिथे सोडून तो आपलं काम पुन्हा सुरू करणार आहे. आर्यनसोबत आई गौरी आणि त्याचा लहान भाऊ अबराम अलिबागमध्येच राहणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan to hire private bodyguard for son aryan khan ensuring his safety vsk
First published on: 01-11-2021 at 15:42 IST