मागील वर्षी डेग्यूमुळे निधन झालेले बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक, निर्माते व पटकथाकार यश चोप्रा यांची आज ८१ वी जयंती. बॉलिवूडमध्ये ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणून ओळख असलेले यश चोप्रा यांच्या स्मृतीमध्ये यश चोप्रा एक निर्भिड चित्रपट निर्माते होते असे बॉलिवूड स्टार शाहरूख खान याने म्हटले आहे.         
‘डर’ ते यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट ‘जब तक है जान’ पर्यंत त्यांच्यासोबत काम केलेल्या ४७ वर्षीय शाहरूखने  आज यश चोप्रा यांची जयंती रॅम्प वॉक करून साजरी केली.
यश चोप्रा यांनी त्याला घडवल्याचे व त्याला चोप्रा यांच्याकडूनच सिनेमा कळल्याचे शाहरूखने या प्रसंगी म्हटले आहे.   
“एक माणूस म्हणून यश चोप्रा यांनी मला निर्भिड सर्जनशिलता शिकवली. तूझे मन तुला सांगत असेल तर तो चित्रपट तू करायला हवा. चित्रपट चांगला चालला तरी चालेल किंवा नाही चालला तरी काही हरकत नाही अशी शिकवण त्यांनी दिली. गेली २० वर्षे यश चोप्रा यांच्यासोबत काम करायला मिळाल्यामुळे मी स्वत:ला खरोखर भाग्यवान समजतो,” असे शाहरूख म्हणाला.    
यश चोप्रा यांच्या सर्वात जास्त चित्रपटांमध्ये भूमिका करणारा बॉलिवूड मधील मी केवळ एकमेव आहे. त्यांच्या शेवटच्या चित्रपटामध्ये देखील काम करण्याची मला संधी मिळाली. अशा निर्भिड यश चोप्रा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप सुदैवी आहे,” असे शाहरूख पुढे म्हणाला.   
यश चोप्रा यांनी ‘वक्त’, ‘दिवार’, ‘सिलसिला’, ‘लम्हे’, ‘डर’, ‘दिल तो पागल है’, ‘वीर-झारा’, आणि ‘जब तक है जान’ या ब्लॉक बस्टर चित्रपटांचे योगदान हिंदी चित्रपटसृष्टीला दिले.