meera-rajputबॉलिवूडमधील चॉकलेट हिरो ते ‘हैदर’मधील गंभीर व्यक्तिरेखा साकारून आपल्या अभिनयाच्या चढत्या आलेखाने सर्वांना थक्क करणाऱ्या शाहीद कपूरला दिल्लीस्थित मुलगी पसंत पडली आहे. अनेक सह-अभिनेत्रींशी नाव जोडले गेलेला शाहीद लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एव्हढेच नव्हे, तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी १४ जानेवारीला त्याचा साखरपुडादेखील झाल्याचे समजते. परंतु, माध्यमांसमोर या वृत्ताला होकार देण्यासाठी शाहीद कचरताना दिसतो. आपली सहचारिणी ही चित्रपटक्षेत्राशी निगडीत नसेल हे शाहीदने या आधीच जाहीर केले आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यात दिल्लीवासी मीरा राजपूतशी शाहीद लग्न करणार असल्याचे समजते. ‘राधा स्वामी सत्संग व्यास’ या धार्मिक संस्थेच्या एका कार्यक्रमात शाहीद आणि मीराची गाठभेठ झाली होती. शाहीद आणि त्याचे वडील या धार्मिक संस्थेचे अनुयायी आहेत.