शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतचा नवा लुक व्हायरल; फोटो पाहून फॅन्स झाले आश्चर्यचकित

मीरा राजपूतने यंदा जो फोटो पोस्ट केलाय तो पाहून फक्त फॅन्सच नाही तर चक्क शाहिद कपूर सुद्धा आश्चर्यचकित झालाय.

shahid-kapoor-mira-rajput-new-look

मीरा राजपूत ही बॉलिवूडमधली सगळ्यात लोकप्रिय स्टार वाईफ्समधील एक आहे. लाइमलाइटपासून दूर असली तर लाखोंच्या संख्येने तिचे चाहते आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टसाठी तिचे चाहते उत्सुक असतात. पण यंदा तिने जो फोटो पोस्ट केलाय तो पाहून फक्त फॅन्सच नाही तर चक्क तिचा पती शाहिद कपूर सुद्धा आश्चर्यचकित झालाय. मीराने पिलो फेस फिल्टरमधून तिचा एक फोटो क्लिक केलाय. या फोटोमध्ये तिचा भलताच लुक दिसून आल्याने फॅन्स तिला ओळखूच शकले नाहीत.

मीरा राजपूतने तिच्या नव्या लुकची झलक इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलीय. यात तिने मोठ्या आकाराचे लिप्स बनवून काही व्हिडीओज सुद्धा शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बात बन जाए’ हे गाणं ऐकायला मिळतंय. मीराने तिच्या घरीच हा व्हिडीओ तयार केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “माझ्या ओठांना केवळ लाईन केलंय…बाकी दुसरं काही नाही…”. सुरूवातीला फोटोंमध्ये तिचे मोठे झालेले ओठ आणि सुजलेले गाल पाहून फॅन्स काही चिंतेत पडले होते. परंतू पुढची कॅप्शन वाचून फॅन्स निश्चिंत झाले.

meera-rajput-instagram-story
(Photo: Instagram/mira.kapoor)

मीरा आणि शाहिदच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत. दोघांनाही एक मुलगी ‘मिशा’ आणि एक मुलगा ‘जैन’, अशी दोन अपत्ये आहेत. शाहिद एक परिपूर्ण फॅमिली मॅन आहे. जेव्हा जेव्हा त्याला कामातून मोकळा वेळ मिळतो, तेव्हा तो कुटुंबासमवेत वेळ घालवतो. शाहिदला बाहेर पार्टी करायला आवडत नाही. तो अधिकाधिक वेळा मीराबरोबरच लंच किंवा डिनरला जातो. मारी राजपूत सुद्धा तिच्या सोशल मीडियावर फॅमिलीसोबतचे वेगवेगळे फोटोज शेअर करत असते. तिच्या स्टायलिश अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत येत असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shahid kapoor wife mira rajput lip fillers videos goes viral on internet prp

ताज्या बातम्या