बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने अॅसिड हल्ल्यातील पीडिता अनुपमा हिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने अनुपमा यांच्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन नवविवाहित जोडप्याला सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations and my love to Anupama as she starts on this new journey of life. May it be filled with love light and laughter. U r the man Jagdeep…and may u both have double the reasons to be happy with this union. https://t.co/hANJGRLD8P
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 20, 2019
अनुपमा यांनी जगदीप सिंग यांच्याशी लग्न केले आहे. अनुपमा या शाहरुख खानच्या ‘मीर फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेशी निगडीत आहेत. २०१३ साली शाहरुखने अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात केली होती. गेल्या पाच वर्षात देशभरातील हजारो अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना या संस्थेने मदत केली आहे. या महिलांवर उपचार करुन त्यांना आत्मविश्वासाने नवं आयुष्य सुरु करण्यासाठी ही संस्था मदत करते.