मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून अभिनेते प्रभाकर मोरे यांचे ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणे सध्या प्रचंड लोकप्रिय झाले आहे. ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटातून हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, सध्या समाजमाध्यमांवर या गाण्याची जोरदार चर्चा आहे. अभिनेते प्रभाकर मोरे आणि अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले असून ‘लास्ट स्टॉप खांदा- प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ’ हा संगीतमय चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्सने ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर, अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश काप्रेकर, प्रियांका हांडे या कलाकारांच्या भूमिका आहेत.