छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने गोव्यात काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित बॉयफ्रेंड आदित्य बिलगीशी लग्न केले. तिचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता रसिकाचे हनीमूनचे फोटो समोर आले असून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंमुळे रसिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

रसिका पती आदित्यसोबत मालदिवला हनीमुनसाठी गेली आहे. तिने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तेथील फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये रसिकाने लाँग शर्ट परिधान केला आहे. या लूकमध्ये रसिका हॉट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. या फोटमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र तिला या फोटोमुळे ट्रोल केले आहे.
आणखी वाचा : कतरिनाने दिले नाही सलमानच्या कुटुंबीयांना लग्नाचे आमंत्रण? अर्पिताने केला खुलासा

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका यूजरने तिच्या या फोटोवर कमेंट करत ‘तू पँट घालायला विसरलीस’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तू आदित्यचा शर्ट घातला आहेस का?’ असा प्रश्न विचारला आहे. तर काही नेटकऱ्यानी रसिका या लूकमध्ये अतिशय हॉट दिसत आहे असे म्हटले आहे.

रसिकाने झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया ही भूमिका साकारत अनेकांची मने जिंकली होती. तिला या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. या पूर्वी तिने पोस्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या.