scorecardresearch

Supriya Sule saree Fire Video : सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना!

Supriya Sule saree Fire : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचाकनपणे पेट घेतल्याची घटना घडली.

Supriya Sule saree Fire Video : सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना!
सुप्रिया सुळे (फोटो- ट्विटर)

Supriya Sule Fire : पुण्यातील एका कार्यक्रमाचे उद्घाटन करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचाकनपणे पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. साडीला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी ती विझवली.

हेही वाचा >> सत्यजित तांबे की शुभांगी पाटील, नाशिक पदवीधरसाठी भाजपाचा कोणाला पाठिंबा? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पाठिंब्यासाठी…”

सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी दीपप्रज्वलन करताना सुळे यांच्या साडीने पेट घेतला. मात्र ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुप्रिया सुळे यांनी बाजूला होत लगेच साडीला लागलेली आग विझवली.

हेही वाचा >>पंकजा मुंडे खरंच नाराज आहेत? चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळेंचे रोखठोक विधान! म्हणाले “अहो त्यांच्या रक्तात…”

या दुर्घटनेनंतर मला कसलीही इजा झाली नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. “आमचे हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे; की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये.आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. सर्वांचे मनापासून आभार,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 13:38 IST

संबंधित बातम्या